विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपळगाव हरेश्वर पोलीसांचा रुट मार्च.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१५/११/२०२४
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्हाभरात कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे १० सहाय्यक अधिकारी व १० पोलीस अंमलदार, ०१ मध्यप्रदेश येथील कंपनीचे अधिकाऱ्यांचे ०३ अधिकारी व २२ कर्मचारी यांच्यासह पिंपळगाव हरेश्वर गावातील मुख्य रस्ते, चौकातून रुट मार्च घेण्यात आला.
पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनपासून या रुट मार्चची सुरवात करण्यात येऊन हा रुट मार्च श्री. छत्रपती शिवाजी महाराज चौक, वरसाडे रस्ता, गोठाणपूरा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, मुख्य बाजारपेठ, रथ गल्ली चौक, सराफ गल्ली, शनी चौक, कालिंकामाता मंदिर चौक ते परत पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन असा रुट शिस्तबद्ध पद्धतीने मार्च घेण्यात आला.