पाचोरा, भडगाव विधानसभेचे उमेदवार प्रताप पाटील यांच्या शिक्षणसंस्थेतील बोगस शिक्षक भरतीची फेर चौकशी व्हावी, विजय पाटील.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१५/११/२०२४
भडगाव तालुक्यातील शिक्षणसम्राट म्हणून ओळखले जाणारे व सन २०२४ च्या पाचोरा भडगाव विधानसभा विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र स्वराज्य पक्षातर्फे पेनाची निब या निशाणीवर निवडणूक लढवत असलेले उमेदवार नानासाहेब प्रताप हरी पाटील यांनी त्यांच्या कैलासवासी हरी पाटील किसान शिक्षण संस्थेच्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या १२ ते १३ शाळेत शिक्षक भरती करुन ७१ बोगस टीईटी शिक्षकांची मान्यता व गुणवत्ता नसतांनाही बोगस शिक्षक भरती केली आहे तसेच गुणवत्तेच्या व मान्यतेच्या आधारावर जवळपास २५० ते ३०० शिक्षकांची भरती करतांना नियमानुसार पोर्टलवर न करता दलालांच्या माध्यमातून लाखो रुपये घेऊन प्रताप पाटील यांनी सर्व नियम धाब्यावर बसवून ऑफलाईन भरती करुन अवैध संपत्ती जमवली असल्याचा आरोप करत तश्या तक्रारी भडगाव येथील सामाजिक कार्यकर्ते विजय दोधा पाटील यांनी
अंमलबजावणी संचनालय (ई. डी.) संचनालय मुंबई, मा. शिक्षणायुक्त सुरज मांढरे महाराष्ट्र राज्य पुणे, मा. मा. पोलीस महासंचालक मुंबई, मा. विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक, मा. जिल्हा पोलीस अधीक्षक जळगाव यांच्याकडे केल्या असून या अगोदरही बऱ्याचशा तक्रारी करण्यात आल्या आहेत परंतु संस्थाचालक प्रताप पाटील यांचे हात मंत्रालयापर्यंत असल्याचे खात्रीलायक वृत्त असून संबंधित विभागाकडून चौकशी करतांना तक्रारदाराला अंधारात ठेवून बोगस चौकशी करण्यात आली असल्याचा आरोप करत सक्षम अधिकाऱ्यांनी तक्रारदाराला सोबत घेऊन फेर चौकशी करावी अशी मागणी विजय दोधा पाटील यांनी संबंधित विभागाकडे केली आहे.
परंतु विजय दोधा पाटील यांनी केलेल्या तक्रारीनुसार व त्यांनी दिलेल्या माहितीनुसार कैलासवासी हरी पाटील किसान शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रताप पाटील यांनी शिक्षक भरती करतांना ती शिक्षक भरती पोर्टलवर केली नसून शासन आदेशानुसार सन २०१३ च्या अगोदर शिक्षक भरती बंद असतांनाही संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथून दलालांच्या माध्यमातून मागील वर्षाचे बोगस कागदपत्रे आणून ३०० शिक्षकांची बोगस भरती केली केली असल्याचा आरोप केला असून या खुलताबाद येथून मिळणाऱ्या बोगस कागदपत्रांची माहिती मी माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागवली असून याबाबत मी केलेल्या तक्रारीची योग्य चौकशी केली गेली नसल्याने मी मा. उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचे सांगितले.
याबाबत अधिक माहिती जाणून घेतली असता प्रताप पाटील हे मागील बऱ्याचशा वर्षांपासून कैलासवासी हरी पाटील किसान शिक्षण संस्थेचे चेअरमन असून हे पद घराणेशाही सारखे उपभोगत आहेत. या पदावर काम करत असतांना त्यांनी भारतीय राज्यघटना व शैक्षणिक विभागाचे सर्व नियम व कायदे धाब्यावर बसवून कामकाज करत आहेत. त्यांच्या या पदाचा दुरुपयोग करुन त्यांनी त्यांच्या वैयक्तिक व खाजगी कामकाजासाठी वेळोवेळी कैलासवासी हरी पाटील किसान शिक्षण संस्थेच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांकडून पैसे घेत असतात असाच काहीसा प्रकार आता मागिल महिन्यात घडला असल्याचे खात्रीलायक वृत्त असून स्वताचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांनी प्रत्येक शिक्षकांकडून ५०००/०० रुपये घेतले होते अशी जोरदार चर्चा भडगाव तालुक्यातील जनतेतून ऐकावयास मिळत होती.
हा गैरप्रकार येथेच थांबत नसून आता कैलासवासी हरी पाटील किसान शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रताप पाटील यांनी पाचोरा, भडगाव विधानसभा निवडणुकीत उमेदवारी जाहीर केली असून ते महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून पेनाची निब या निशाणीवर निवडणूक लढवत आहेत. या निवडणुकीसाठी लागणारा पैसा उभाकरण्यासाठी त्यांनी प्रत्येक शिक्षकांकडून एक महिन्याचा पगार सक्तीने वसूल केला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. तसेच त्यांच्या प्रचारासाठी सर्व शिक्षकांना कामाला लावले असल्याचे दिसून येत असून हे शिक्षक, शिक्षिका प्रचार रॅलीत, शक्ती प्रदर्शन मेळाव्यात, जाहीर सभेत गळ्यात पक्षाच्या चिन्हाचा रुमाल, डोक्यावर टोपी व हातात प्रचारपत्रक घेऊन उघड, उघडपणे प्रचार करतांना दिसून येत आहेत.
विशेष म्हणजे सामाजिक कार्यकर्ते विजय दोधा पाटील यांनी ०१ जानेवारी २०२२ रोजी बोगस शिक्षक भरती बाबतची तक्रार यांच्याकडे लेखी स्वरुपात केली होती या तक्रारी अर्ज दखल केला होता या तक्रारी अर्जाची दखल घेत यांनी संबंधित विषय हा शिक्षण विभागाशी निगडित असल्याकारणाने सदर तक्रारी अर्जाची सखोल योग्य ती चौकशी करण्याबाबत सुचना देत माननीय शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग यांच्याकडे पाठविण्यात आल्यानंतर माननीय शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाचे जबाबदार अधिकारी यांनी संस्थाचालकाला अभय देत थातुरमातुर चौकशी केली असल्याचे सांगत मी आता मा. उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचे तक्रारदार विजय दोधा पाटील यांनी सांगितले असून शासन याबाबत काय भूमिका घेते याकडे तक्ररदार व नोकरीपासून वंचित राहीलेल्या गुणवत्ता पात्र उमेदवारांचे लक्ष लागले असून तसे
ताजा कलम
पाचोरा, भडगाव विधानसभा मतदारसंघातील शिक्षणसम्राट म्हणून ओळखले जाणारे उमेदवार प्रताप पाटील हे महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून पेनाची निब या निशाणीवर निवडणूक लढवत आहेत. या निवडणुकीत त्यांच्या शैक्षणिक संस्थेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी निवडणूक प्रचारात सहभागी झाले आहेत याबाबत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर तक्रार दाखल करणार असल्याचे विजय दोधा पाटील यांनी सांगितले आहे.