किशोर आप्पा पाटील यांना निवडून आणण्याचा जन आंदोलन संघटकांचा निर्धार.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१३/११/२०२४
मागील दहा वर्षात पाचोरा, भडगाव तालुक्यात ज्यांनी विकासाची गंगा असे आमदार किशोर आप्पा पाटील यांची आपल्या तालुक्याला अत्यंत गरज आहे व त्यांना तिसऱ्यांदा निवडून दिले तर ते नक्कीच मंत्रीपदावर विराजमान होऊन पाचोरा, भडगाव तालुक्यातील जनसामान्यांच्या गरजा पूर्ण करतील म्हणून अशा जनहितार्थ झटणाऱ्या आमदार किशोर आप्पा पाटील यांना भरघोस मतांनी निवडून दिले पाहिजे असे विनंतीपूर्वक आवाहन भडगाव जन आंदोलन सामाजिक कार्यकर्ते विजय दोधा पाटील व त्यांचे सहकारी व कार्यकर्त्यांनी केले आहे.
याबाबत पुढे बोलतांना जन आंदोलन सामाजिक कार्यकर्ते विजय पाटील यांनी सांगितले की भडगाव विधानसभा मतदारसंघातील स्वताला शिक्षणसम्राट व शेतकरी पुत्र म्हणून घेणारे शेतकरी व शिक्षण संस्थेच्या नावाखाली शासनाला तसेच शिक्षकांना लुटणारे लुटारु ज्यांना नामनिर्देशन पत्र भरतांना स्वताचे नाव लिहीण्यासाठी दुसऱ्याचा आधार घ्यावा लागला ज्यांना लिहिता, वाचता येत नाही ज्यांच्या डोळ्यांवर श्रीमंतीची पट्टी बांधली गेली आहे असे डोळे बांधून हत्तीचे वर्णन करणाऱ्या उमेदवाराला निवडून देणे म्हणजे पाचोरा, भडगाव विधानसभा मतदारसंघातील गावांना अंधारात ढकलण्यासारखे होईल म्हणून ज्यांनी मागील दहा वर्षात भरघोस निधी उपलब्ध करुन घेत दोघेही शहरात व गावागावात सर्वांगीण विकास केला आहे असे आमदार किशोर आप्पा पाटील यांना तिसऱ्यांदा निवडून देणे गरजेचे असते आहे असे मत व्यक्त केले.
तसेच जो उमेदवार स्वताच्या वाढदिवसाच्या खर्चासाठी तसेच निवडणुकीत लागणारा पैसा खर्च करण्यासाठी जबरदस्तीने शिक्षकांच्या पागारातून सक्तीने पैसा जमा करतो ज्याने भरड धान्य घोटाळा व कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केलेला भ्रष्टाचार आजही लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे असा जनतेला लुटण्याच्या हेतुने ‘बकध्यान’ करुन बसलेल्या उमेदवाराला मतदान न करता येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान करतांना आमदार किशोर आप्पा पाटील यांना मतदान करुन आपल्या सेवेची संधी द्यावी असे आवाहन जन आंदोलन सदस्य व सामाजिक कार्यकर्ते विजय पाटील यांनी केले आहे.