बापाच्या प्रचारासाठी लेकर सरसावली, डॉ. प्रियंका व सुमित या भाऊ, बहिणीनं पालथा घातला मतदारसंघ.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~११/११/२०२४
पाचोरा, भडगाव विधानसभा निवडणुकीत प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली असून प्रचारासाठी शेवटचे काही दिवस राहिले असल्याने प्रचाराचा ज्वर वाढत चालला असल्याचे दिसून येत आहे. या प्रचाराच्या रणधुमाळीत महायुतीचे उमेदवार आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रचारार्थ त्यांचा मुलगा सुमित पाटील व त्यांची सुकन्या डॉ. प्रियंका पाटील यांनी वडिलांच्या प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेत शहर, गावा, गावातील गल्लीबोळात घरोघर जाऊन संपूर्ण मतदारसंघातील परिस पिंजून काढत आमदार किशोर आप्पा पाटील यांना आपले बहुमोल मत देऊन भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला पाचोरा, भडगाव मतदारसंघातील जनतेकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या सुकन्या डॉ. प्रियंका पाटील यांनी तिर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपळगाव हरेश्वर येथील श्री. हरिहरेश्वर मंदिरात तसेच श्री. प्रभू गोविंद महाराजांच्या दर्शनाने दिनांक १८ ऑक्टोबर पासून प्रचाराचा शुभारंभ केला या प्रचार फेरीत त्यांनी मागील २१ दिवसात त्यांनी पाचोरा, भडगाव शहरासह तालुक्यातील गावागावांतील गल्लीबोळाचा प्रचारफेरी काढून परिसर पिंजून काढत बापासाठी मते मागितली.
या प्रचारफेरीला तसेच प्रचार रॅलीला मतदारसंघातील मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला व दिवसेंदिवस प्रतिसाद वाढत चालला असून त्यांना मतदारांकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. या प्रत्येक गावात काढण्यात आलेल्या रॅली मध्ये सुमती पाटील व डॉ. प्रियंका पाटील यांचे ठिकठिकाणी औक्षण करुन जंगी स्वागत करण्यात आले. मतदारांनी दाखवलेली आपुलकी व वाढता प्रतिसाद पाहून मी भारावून गेली असल्याचे मत डॉ. प्रियंका पाटील यांनी प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त केले.
या प्रचार रॅली मध्ये युवा सेनेचे जिल्हाप्रमुख जितेंद्र जैन, जय बारावरकर, विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख सुरज शिंदे, राहुल पाटील, विशाल पाटील, समीर शेख, यश ठाकुर, सागर महाजन तसेच शहर व पाचोरा, भडगाव परिसरातील ग्रामीण भागातील संपूर्ण शिवसेना, युवासेना पदाधिकारी त्यांचे युवा सेनेचे सहकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच युवा नेतृत्व सुमित पाटील यांच्या सोबत पुरुषोत्तम माळी, जिल्हा समन्वयक युवासेनेचे निलेश पाटील, युवासेनेचे जिल्हा संघटक नितीन महाजन, शिवसेनेचे उपशहरप्रमुख योगेश सुर्यवंशी, तालुका सरचिटणीस अनिल महाजन, समाधान पाटील, जगदीश पाटील, स्वप्नील पाटील, रविंद्र पाटील व बहुसंख्य युवा सेनेचे कार्यकर्ते सामील झाले होते.