स्वराज्य पक्षाच्या उमेदवारालाच पडला श्री. छत्रपती शिवाजी महाराजांचा विसर.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~११/११/२०२४
पाचोरा, भडगाव विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र स्वराज्य पक्षातर्फे भडगाव येथील शिक्षणसम्राट म्हणून ओळखले जाणारे प्रताप हरी पाटील हे अधिकृत उमेदवार पेनाची निब या निशाणीवर निवडणूक लढवत आहेत. महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उमेदवार प्रताप हरी पाटील यांचे नामनिर्देशन पत्र भरतांना तसेच शक्ती प्रदर्शन करण्यासाठी घेण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात श्री. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशाचे तेरावे वारसदार माननीय संभाजी राजे हे स्वताहून उपस्थित होते.
असे असले तरी श्री. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेले संभाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र स्वराज्य पक्षाची उमेदवारी करत असले तरी मात्र महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रताप पाटील यांनी आजपर्यंत घेतलेल्या मेळाव्यासाठी बनवलेले जाहिरात फलक (बॅनर), स्वागत फलक तसेच स्वताच्या फोटोसह स्वताला मिळालेल्या पेनाची निब या निशाणीचे मोठमोठे बॅनर पाचोरा, भडगाव शहरासह दोघेही तालुक्यातील खेड्यापाड्यात लावलेले आहेत.
जनमानसातील सुरु असलेल्या चर्चेच्या माध्यमातून सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी सत्यजित न्यूज नेटवर्क कडून सगळीकडे निरीक्षण करण्यात आले असून आजपर्यंत एकही ठिकाणी आमचे राजे व ज्यांच्या नावाचा वापर करुन मते मिळवून घेण्यासाठी फक्त आणि फक्त नावाचे भांडवल करुन मते मागत आहेत त्यांचा फोटो म्हणजे श्री. छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो कुठेही आढळून आला नसल्याने या उमेदवाराला खरच राज्यांबद्दल आदर आहे का हा प्रश्न जनमानसातू उपस्थित केला जात आहे.