उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या उमेदवार सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांना वाढता पाठिंबा.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~११/११/२०२४
पाचोरा, भडगाव विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या उमेदवार सौ. वैशालीताई सुर्यवंशी या मशाल चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. या निवडणुकीत आपल्याला भरघोस मते मिळवून घेण्यासाठी त्यांनी जाहीरनामा जनतेसमोर ठेवत आम्हाला निवडून दिल्यास सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी विविध कल्याणकारी योजना आणणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांनी मतदारसंघातील पवित्र तिर्थक्षेत्र व मंदिरात माथा टेकवून मतदार बांधवांच्या गाठीभेटी घेत आपल्या प्रचाराला सुरुवात केली असून या प्रचार दौऱ्यादरम्यान त्यांनी पाचोरा, भडगाव शहरांसह नगरदेवळा, पिंपळगाव हरेश्वर, शिंदाड, वरखेडी या मोठ्या लोकसंख्येच्या गावात तसेच मतदारसंघातील प्रत्येक गाव, खेड्यापाड्यातील घराघरात जाऊन मतदान करण्याचे आवाहन करत आहेत.
या प्रचार फेरीदरम्यान सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांना वाढता पाठिंबा मिळत असून गावागावात ठिकठिकाणी सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांचे औक्षण करुन स्वागत केले जात आहे. यामागील कारण म्हणजे सौ. वैशालीताई सुर्यवंशी या पाचोरा, भडगाव विधानसभा मतदारसंघातील पहिल्या महिला उमेदवार उमेदवारी करत असल्याने महिलांमध्ये आगळावेगळा उत्साह संचारला असून सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांना स्व. तात्यासाहेब आर. ओ. पाटील यांचा वारसा लाभला असल्याने त्यांना याचा पूरेपूर फायदा होईल व त्याच विजयी होतील अशी अपेक्षा जनमानसातून व्यक्त केली जात आहे.
सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांच्या प्राराची धुरा राजेंद्रसिंग देवरे, बाळू पाटील, अन्नू शेख, रमेशजी बाफना, छोटू लोहार, धर्मराज पाटील, बापू पाटील, ॲड. अभय पाटील, पांडुरंग भामरे, सागर गवते, गणेश परदेशी, अनिल राऊत, सोमनाथ महाजन, पंढरीनाथ चौधरी, अर्जुन महाजन, रवींद्र बापू, गायके अण्णा, दत्तू भोई, योगेश पाटील, विकी महाजन, मुकेश राजपूत, रवी महाजन, बबलू पाटील, सागर देवरे, रमेश भोई, रामचंद्र महाजन, जब्बु शेख, विजय गढरी, नितीन भोई आदी महाविकास आघाडीच्या मातब्बर कार्यकर्ते व सहकाऱ्यांनी सांभाळली असल्याने त्या नक्कीच बहुमताने निवडून येतील व विजयी होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.