आमदार व भाजपा निरीक्षकांच्या भेटीत प्रचाराची रणनीती आखली.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०९/११/२०२४
पाचोरा, भडगाव विधानसभा मतदारसंघात कधी नव्हे इतक्या इच्छुक उमेदवारांनी आपली उमेदवारी जाहीर केली असून आता प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. या रणधुमाळीत महायुतीचे उमेदवार आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झाली असून जनमासातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.
या प्रचाराच्या भारतीय जनता पक्षाचे निरीक्षक तथा गजरात गांधीनगर महापालिकेचे उपमहापौर प्रेमळ सिंहजी गोल, अनिल भिई शहा यांनी महायुतीत उमेदवार आमदार किशोर आप्पा पाटील यांची भेट घेऊन प्रचारासाठीची रणनीती ठरविण्यात आली. तसेच भारतीय जनता पक्ष पूर्ण ताकदीनिशी आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या पाठीशी उभा असल्याने आप्पासाहेब किशोर आप्पा पाटील हे मोठ्या मताधिक्याने जिंकणार असल्याचा आशावाद व्यक्त करत आमदार किशोर आप्पा पाटील यांनी मतदारसंघात सर्वांगीण विकास केला असल्याने सर्वसामान्य जनता ही कायम विकास करणाऱ्या नेतृत्वाच्या पाठीशी रहाते असे मत भारतीय जनता पक्षाचे निरीक्षक प्रेमळ सिंहजी गोळ व्यक्त केले. या भेटीच्या वेळी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा जिल्हा उपाध्यक्ष मधुकर भाऊ काटे, माजी शहरप्रमुख नंदू भाऊ सोमवंशी उपस्थित होते.
***********************************************
भारतीय जनता पक्षाच्या बंडखोरांवर पक्षातून हकालपट्टी करण्यासाठी आम्ही कारवाई केली असून तसा अहवाल पाठवण्यात आला असून पक्षश्रेष्ठींकडून योग्य ती दखल घेतली गेली असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाच्या निरीक्षक पथकांनी आमदार किशोर आप्पा पाटील यांना दिली.
यावेळी जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, तालुकाप्रमुख सुनील पाटील, उपजिल्हाप्रमुख किशोर बारावकर, बाजार समिती सभापती गणेश पाटील, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल आदी पदाधिकारी यांची उपस्थिती होती.