‘धन शक्ती विरोधात जनशक्ती’ जामनेर तालुक्यात निवडणुक लढवण्यासाठी बहिणीने दिली लाडक्या भावाला लाखाची मदत.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०७/११/२०२४
सद्यस्थितीत महाराष्ट्र राज्यात २०२४ च्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. या रणधुमाळीत सत्ताधारी पक्षाची महायुती व विरोधात महाविकास आघाडीमध्ये अटीतटीची व चुरशीची लढत होतांना दिसून येते आहे.
या निवडणुकीत आपलाच विजय झाला पाहिजे म्हणून उमेदवारांनी कंबर कसली असून जास्तीत, जास्त मते पदरात पाडून घेण्यासाठी डावपेच खेळले जात आहेत. मग हे करत असतांना मतदारांना आकर्षित खुष व करण्यासाठी उमेदवार वाट्टेल ते करायला तयार असून मतदान मिळवून घेण्यासाठी बोकड, कोंबड्यांचे बळी सोबतच पैशांचा पाऊस व दारुचा महापूर आलेला दिसून येत आहे.
असे असले तरी मात्र जामनेर तालुक्यातील वातावरण वेगळेच दिसून येत असून यात एका बाजूला मतदान मिळवून घेण्यासाठी उमेदवार लाखो नव्हे तर करोडो रुपयांचा चुराडा करत असतांनाच मात्र दुसरीकडे जामनेर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत उभ्या असलेला अपेक्षित उमेदवाराला निवडून देण्यासाठी व निवडून येण्यासाठी सर्वसामान्य जनतेतून स्वयंस्फुर्तीने पाचशे, हजार नव्हे तर लाख रुपये आर्थिक मदत दिली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत जामनेर तालुक्यात सत्ताधारी महायुतीचे मागील सतत सहा पंचवार्षिक निवडणुकीत नाबाद राहुन आता सातव्यांदा निवडणुक लढवत असलेले नामदार गिरीश भाऊ महाजन तर यांच्या विरोधात सर्वसामान्य कुटुंबातील कधीकाळी गिरीश भाऊंच्या सोबत असलेले महाविकास आघाडीचे सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार दिलीप खोडपे सर हे निवडणूक लढवत आहेत.
या दोघ उमेदवारांच्या बाबतीत बोलायचे झाले तर कहां “राजा भोज और कहां गंगू **” अशी परीस्थिती बघायला मिळत असली तरी जामनेर तालुक्याच्या उज्वल भविष्यासाठी व परिवर्तन घडवून आणण्यासाठी जामनेर तालुक्यातील मतदारांनी विडा उचलला असून सगळ्यांना हवा असलेला तळागाळातील, सर्वसामान्य उमेदवार दिलीप खोडपे सरांना चांगला प्रतिसाद मिळत असून यांच्या विजयासाठी लागणारा खर्च भरुन काढण्यासाठी गावागावांतील लोकांनी मदतीचा हात पुढे करत आपापल्या ऐपतीप्रमाणे पाचशे, हजार, दोन हजार, पाच हजार नव्हे तर चक्क लाख रुपये लोकवर्गणी देऊन पाठींबा दिला आहे.
यात शहापूर येथील सौ. मीराबाई विजय पाटील व त्यांचे सुपुत्र सागर विजय पाटील यांनी तालुक्याला चांगले नेतृत्व मिळावे म्हणून दिलीप खोडपे सरांना पसंती देत त्यांचा निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी व्हावा म्हणून पाचशे, हजार नव्हे तर चक्क एक लाख रुपयांचा धनादेश देऊन पाठींबा दिला असल्याने जामनेर तालुक्यातील ही निवडणूक म्हणजे ‘धन शक्ती विरोधात जनशक्ती ची असल्याने या मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागले असल्याचे बोलले जात आहे.