राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या १४, जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात समन्वयक म्हणून अनिल भाऊ महाजन यांची नियुक्ती.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०५/११/२०२४
जळगाव ग्रामीण विधानसभा १४ मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री. गुलाबराव आप्पा देवकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ आधीकृत समन्वयक म्हणून पक्षाचे प्रदेश संघटक, सचिव श्री. अनिल भाऊ महाजन यांची निवड करण्यात आली आहे.
उमेदवार श्री.गुलाबराव आप्पा देवकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ दैनंदिन सर्व कामकाजामध्ये लक्ष घालून त्याचप्रमाणे प्रदेश कार्यालयाशी संपर्क साधून दैनंदिन घडामोडीचा अहवाल द्यावा असे आदेश पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री. जयंतराव पाटील यांनी दिले आहेत. तसेच पक्षाचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार यांनी सहिनिशी नियुक्तीपत्र दिनांक ०५/११/२०२४ रोजी मीडियाला प्रसिद्ध केले आहे.