भडगाव तालुक्यात किशोर आप्पा पाटील यांना वाढता पाठिंबा, भडगाव शहरातून भव्य रॅलीने प्रचाराला सुरुवात.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२८/१०/२०२४
महायुतीचे अधिकृत उमेदवार किशोर आप्पा पाटील यांनी आज सकाळी भडगाव येथील बाजारपेठ चौकातील श्रीराम मंदिरात भगवान श्रीरामाचे दर्शन घेऊन नारळ वाढवून प्रचाराला सुरुवात केली यावेळी भडगाव शहरातून भव्य रॅली काढण्यात आली या प्रचार रॅली मध्ये भडगाव शहरासह तालुक्यातील शिंदे गट शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे तसेच रिपाई व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी होऊन घोषणाबाजी करत किशोर आप्पा पाटील यांना जोरदार पाठिंबा दर्शवत किशोर आप्पा पाटील यांच्या विजयाचा संकल्प केला.
या रॅलीदरम्यान आमदार किशोर आप्पा पाटील यांचे घराघरातील माता, भगिनींनी औक्षण करुन विजयी होण्यासाठी आशिर्वाद दिला या रॅलीत ‘आप्पा साहेब तुम आगे बढो हम तूम्हारे साथ हे, ‘कोणी कितीही मारा गप्पा निवडून येतील किशोर आप्पा’ अशा घोषणांनी भडगाव शहर दणाणून गेले होते.
या प्रचार रॅली मध्ये शिवसेनेचे भडगाव शहरप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख डॉ. विशाल पाटील, तालुकाप्रमुख संजय पाटील, शेतकी संघाचे अध्यक्ष भैय्यासाहेब पाटील, रिपाईचे तालुकाध्यक्ष एस. डी. खेडकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रविंद्र महाजन, समन्वय समितीचे अध्यक्ष युवराज पाटील, भाजपाचे शैलेश पाटील, माजी नगराध्यक्ष शशिकांत येवले, अतुल पाटील, युवासेनेचे जिल्हाप्रमुख लखिचंद पाटील, शहरप्रमुख आबा चौधरी, बबलू देवरे, डॉ. प्रमोद पाटील, बापू पाटील, युवासेनेचे दुर्गेश वाघ, इमरान अली सय्यद, डॉ. वसीम मिर्झा, जगन भोई, संतोष महाजन, नितीन महाजन, अतुल परदेशी, निलेश पाटील, देवीदास अहिरे, गोंडगावचे सरपंच राहुल पाटील, बाजार समितीचे उपसभापती पी. एक. पाटील आदी पदाधिकारी व बहुसंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.