उमेदवाराने दिलेल्या जेवणावळीतून मटणाची डेग पळवली काकणबर्डी परिसरातील घटना.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२८/१०/२०२४
नुकतीच विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून या रणधुमाळीत जो, तो उमेदवार आपल्याला जास्तीत, जास्त मते कशी मिळवता येतील याकरिता प्रयत्नशील आहेत व आजच्या युगात कोणत्याही निवडणुकीमध्ये मते मिळवून घेण्यासाठी काहीतरी दिल्याशिवाय मते मिळत नाही असा अनुभव येत असल्याने सगळेच उमेदवार मतांचा गठ्ठा पदरात पाडून घेण्यासाठी कमरेचे सोडून डोक्याला बांधुन वाट्टेल ते करायला तयार होतात.
परंतु या सन २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पाचोरा, भडगाव मतदारसंघात उमेदवारांची संख्या जास्त असल्याने हे उमेदवार आपला मतदानाचा टक्का वाढवून घेण्यासाठी बोकड, कोंबड्यांचे बळी देत असून सोबतच दारु ही पाजून मतदारांना खुश करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. याच प्रयत्नात एका उमेदवाराने काल दिनांक २७ ऑक्टोबर २०२४ रविवार रोजी पाचोरा तालुक्यातील काकणबर्डी परिसरात एका ठिकाणी दोन बोकडाचा बळी देत जेवणासाठी येणाऱ्या मतदारांसाठी दारुची व्यवस्था करण्यात आली होती.
परंतु काकणबर्डी परिसरात संबंधित उमेदवाराकडून मटनाचे जेवण व सोबतच दारुची व्यवस्था केली असल्याने याठिकाणी लहान, मोठ्यांनी एकच धाव घेतली संबंधित उमेदवाराने बांधलेल्या अंदाजापेक्षा जास्त संख्येने लोकांची झुंबड पाहून आयोजकांनी आपल्या वाट्याला काही रहाते की नाही या भितीपोटी चक्क मटणाची डेग पळवून नेल्याचा प्रकार घडला असल्याचे खात्रीलायक वृत्त असून आज पाचोरा शहरासह काकणबर्डी व संपूर्ण तालुक्यात हा चर्चेचा विषय ठरला होता तसेच मटनाची डेग पळवतांना काही ठगांणी चित्रफीत काढून ती सोशल मिडियाव्दारे
सगळीकडे पाठवल्यानंतर संबंधित उमेदवाराने मतदारांना दिलेल्या पार्टीची जेववणापेक्षा चर्चा चांगलीच रंगली असल्याचे दिसून येत आहे.