जामनेर तालुक्यातील जनता तन, मन, धनाने दिलीप खोडपे सरांच्या मागे, गिरीश भाऊ महाजनांना फुटला घाम.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२८/१०/२०२४
[आजपर्यंत झालेल्या व होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये विजय मिळवण्यासाठी उमेदवार पैशांची वाटप करतांना दिसून येतात मात्र जामनेर तालुक्यात प्रथमच अपेक्षित उमेदवार निवडून आणण्यासाठी त्या उमेदवाराला लोकवर्गणीतून निधी उपलब्ध करुन दिला जात असल्याचे दिसून येत असल्याने आता खरी परिवर्तनाची लाट उसळली आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.]
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जामनेर तालुक्यात सातव्यांदा भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी करणारे बलाढ असे गिरीश भाऊ महाजन व शरद पवार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाचे प्रतिस्पर्धी सर्वसामान्य कुटुंबातील सच्चा माणूस व समाजसेवक म्हणून ओळखले जाणारे उमेदवार दिलीप खोडपे सर यांच्यामध्ये चुरशीची लढत होणार असल्याचे दिसून येत आहे. यात एका बाजूला काम, दाम, दंड, भेद, असतील, नसतील त्या सर्व क्लृप्त्या व डावपेच आखले जात असून सत्तेपुढे शहाणपण चालत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
कारण जामनेर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या मनात वेगळेच काहीतरी शिजत असल्याचे चित्र दिसून येत आहे. व आता परिवर्तन घडवून आणण्यासाठी सर्वसामान्य जनता तन, मन, धनाने गिरीश भाऊ महाजन यांच्या विरोधात उभे ठाकली आहे. याचेच जीवंत उदाहरण म्हणजे दिलीप खोडपे सरांचे गावागावात, गल्लीबोळात औक्षण करुन स्वागत केले जात आहे. तसेच गावागावातून त्यांना आर्थिक मदत केली जात आहे.
दिलीप खोडपे सर हे दिनांक २५ ऑक्टोबर २०२४ शुक्रवार रोजी जामनेर तालुक्यातील करमाड या गावात प्रचारासाठी गेले असता त्यांचे अनेक माता भगिनींनी औक्षण केले तसेच शकुंतलाबाई सुरेश पाटील या गरीब बहिणीने २१००/०० रुपयांचा धनादेश देऊन आर्थिक मदत केली व विजयी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या अशीच आर्थिक मदत संपूर्ण जामनेर तालुक्यातील गावागावांतील, गल्लीबोळातील सर्वसामान्य जनता करत असल्याचे खात्रीलायक वृत्त असून आता जामनेर तालुक्यातील जनतेला परिवर्तन पाहिजे आहे हे स्पष्ट दिसत आहे.
मात्र असले तरी समोरील उमेदवार हे सत्तेवर असल्याने त्यांच्याकडे काम, दाम, दंड, भेद ही सर्व शस्त्रे असल्याकारणाने सर्वसामान्य जनता आज जरी उघड, उघड बोलू शकत नसली तरी मात्र आपल्या मतदानातून नक्कीच परिवर्तन घडवून आणतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.