भोजे गावात एका पंचवीस वर्षीय इसमाने पैशाच्या जोरावर केला अल्पवयीन मुलीशी विवाह.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१६/१०/२०२४
पाचोरा तालुक्यातील भोजे येथील एका पंचवीस वर्षीय इसमाने पैशाच्या जोरावर परराज्यातील एका अल्पवयीन मुलीशी विवाह केला असून या अल्पवयीन मुलीच्या कुटुंबाच्या गरिबांचा फायदा घेत हा विवाह केला असल्याचे खात्रीलायक वृत्त सत्यजित न्यूजच्या हाती आले आहे. तसेच संबंधित इसम हा भोजे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विवाह नोंदणी करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे म्हणून महिला दक्षता समितीच्या वतीने या झालेल्या विवाहाची सखोल चौकशी करुन जर सदर तरुणी अल्पवयीन असेल तर संबंधित तरुणाविरुध्द बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार रितसर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे.
याबाबत अधिक माहिती जाणून घेतली असता संबंधित इसमाने ज्या अल्पवयीन मुलीशी विवाह करुन संसार थाटला आहे त्या पिडीत मुलीने गावातील काही महिलांजवळ रडत, रडत पश्चात्ताप व्यक्त करत असल्याची जोरदार चर्चा भोजे गावातून ऐकायला मिळत असून संबंधित इसम हा अवैध सावकारीचा व्यवसाय करतो व व्याजाच्या पैशाच्या जोरावर गाव परिसरात दादागिरी करतो अशीही माहिती समोर येत असून आजच या सावकाराच्या विरोधात पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला रितसर तक्रार दाखल करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे.