आज आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते २४ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~११/१०/२०२४
आज दिनांक ११ ऑक्टोबर २०२४ शुक्रवार रोजी पाचोरा, भडगाव तालुक्याचे लाडके आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते २४ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. योगायोगाने आज तारखेत ही साम्य आढळून येते कारण वर्ष २०२४ म्हणजे सन २४ हि संख्या पाहता आजच्या २४ कोटींच्या कामांचे भूमिपूजन हा एक योगायोगच म्हणावा लागेल.
आज होणाऱ्या भूमीपूजनाच्या विकासकामांमध्ये पाचोरा शहरापासून थोड्याच अंतरावर असलेल्या काकणबर्डी येथील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या खंडेराव महाराज मंदिराचा परिसरात पाच कोटी रुपयांच्या निधीतून विविध सुविधा उपलब्ध करुन देत हा परिसर विकसित करुन सुशोभीकरण करणे, तालुक्यातील होतकरु खेळाडूंसाठी पाच कोटी रुपयांच्या निधीतून अत्याधुनिक क्रिडा संकुलनाचे तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी गिरड रस्त्यावरील कृषी विभागाच्या कार्यालय परिसरात जिल्ह्यातील पहिले सुसज्ज, अत्याधुनिक असे १३ कोटी ९० लाख रुपयांच्या तालुका कृषी भवनाच्या इमारतीचे भूमिपूजन अशा २४ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन आज पाचोरा, भडगाव तालुक्याचे लाडके आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला पाचोरा तालुक्याचे प्रांताधिकारी मा. श्री. भुषण अहिरे, विभागीय कृषी सहसंचालक मा. श्री. सुभाष काटकर, अधीक्षक अभियंता मा. श्री. प्रशांत सोनवणे, जिल्हा कृषी अधिकारी कुर्बान तडवी, तहसील मा. श्री. विजय बनसोडे,मा. श्री. नवनाथ सोनवणे, मा. श्री. रवींद्र नाईक, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मा. श्री. रावसाहेब पाटील, बाजार समितीचे सभापती मा. श्री. गणेश पाटील, गटविकास अधिकारी मा. श्री. गोकुळ बोरसे, मुख्याधिकारी मा. श्री. मंगेश देवरे, भडगाव शेतकरी संघाचे चेअरमन मा. श्री. भैय्यासाहेब पाटील, विकास पाटील, राजेंद्र पाटील, प्रकाश पाटील, सुनील पाटील, संजय पाटील, प्रदीप देसले, पदमसींग पाटील, डॉ. भरत पाटील, युवराज पाटील, संजय गोहिल, नरेंद्र पाटील, पंढरी पाटील, डॉ. विशाल पाटील, किशोर बारवकर, जितेंद्र जैन, वसंत पाटील, रमेश पाटील, राहुल पाटील, प्रकाश तांबे, मनोज सिसोदिया, लखिचंद
पाटील, युसुफ पटेल, विशाल पाटील, राजेंद्र परदेशी, ज्ञानेश्वर सोनार, भोला पाटील, सुमित सावंत, समाधान पाटील, सुधाकर पाटील, जगदीश पाटील, रमेश जाधव, दिपक पाटील, गणेश भुंगेरे, जगदीश चौधरी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तरी या कार्यक्रमाला पाचोरा शहरासह तालुक्यातील शेतकरी, क्रीडाप्रेमी यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन बालाजी कन्स्ट्रक्शन परिवारातर्फे करण्यात आले आहे.