कुऱ्हाड, अंबे वडगाव रस्त्यावर दिवसा बिबट्याचे दर्शन, शेतकरी व शेतमजुरांमध्ये भितीचे वातावरण.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२२/०९/२०२४
काल दिनांक २१ सप्टेंबर २०२४ शनिवार रोजी अंबे वडगाव येथील शेतकरी केशव चिंधा पाटील यांच्या सार्वे, जामने शिवारातील बिबट्याने पत्र्याच्या शेडमध्ये घुसून कुत्री व कुत्र्याच्या पिलांचा फडशा पाडला होता. ही घटना ताजी असतांनाच आज सायंकाळी कुऱ्हाड ते अंबे वडगाव रस्त्यावर धनराज हिरे हे त्यांच्या शेतातून मोटारसायकल वरुन घराकडे जात असतांनाच त्यांच्या समोर काही अंतरावर बिबट्या कुऱ्हाड ते अंबे वडगाव रस्ता ओलांडून भगवान चौधरी यांच्या शेताकडून दुसऱ्या बाजूला असलेल्या शेतात जातांना
दिसून आला यावेळी मोटारसायकल समोर अचानकपणे बिबट्या आल्याने यांनी प्रसंगसावधाता बाळगत मोटारसायकलची रेस वाढवून हॉर्न वाजवून बिबट्याला पळवून लावले.
नशीब बलवत्तर म्हणून बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढवला नाही नाहि तर मोठा अनर्थ घडला असता असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच सार्वे, जामने, कुऱ्हाड खुर्द, कुऱ्हाड बुद्रुक, अंबे वडगाव, कळमसरा, मालखेडा, लोहारा या गावांच्या शेत शिवाराला लागूनच मोठे राखीव जंगल असल्याने बिबट्या या परिसरातून जात नसल्याने शेतकरी व शेतमजुरांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी वनविभागाने तत्परतेने सापळा लावून या बिबट्याला दुसरीकडे नेऊन सोडावे अशी मागणी केली जात आहे.