कुऱ्हाड खुर्द बसस्थानक परिसरातील अतिक्रमण काढण्यासाठी ग्रामपंचायतीने अतिक्रमण धारकांना दिलेली नोटीस ही प्रेमपत्र ठरु नये.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१९/०९/२०२४
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द येथील बसस्थानक परिसरातील अतिक्रमण काढण्यासाठीची मागणी मागील बऱ्याचशा वर्षांपासून केली जात आहे तसेच बऱ्याचशा वेळा अतिक्रमण काढण्यासाठी प्रयत्न देखील करण्यात आले होते. परंतु कुऱ्हाड गावातील अतिक्रमण धारकांनी कुऱ्हाड खुर्द ग्रामपंचायतीच्या नोटीसला व वारंवार विनंती करुन दाद दिली नव्हती म्हणून आजच्या घडीला कुऱ्हाड खुर्द ग्रामपंचायतीवर कार्यरत असलेल्या सरपंच सौ. कविताताई प्रदिप महाजन, उपसरपंच मा. श्री. कौतीक शिवराम पाटील व ग्रामविकास अधिकारी मा. श्री. रमेश जीवराम महाजन व सदस्यांनी ग्रामस्थांच्या आलेल्या तक्रारींची दखल घेऊन मा. जिल्हाधिकारी व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे ठराव पाठवून तसेच पाचोरा येथील मा. न्यायालयात दावा अतिक्रमण काढण्यासाठी रितसर परवानगी मागितली होती.
आता नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार कुऱ्हाड खुर्द ग्रामपंचायतीने केलेल्या दाव्यचा निकाल ग्रामपंचायतीच्या बाजूने लागला असल्याचे खात्रीलायक वृत्त असून या निकालानुसार कुऱ्हाड खुर्द ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य व ग्रामविस्तार अधिकारी यांनी दिनांक १९ सप्टेंबर २०२४ गुरुवार रोजी रहदारीला अडथळा निर्माण होत असलेल्या एकुण ३० अतिक्रमण धारकांना नोटीस देऊन नोटीस दिल्यापासून पाच दिवसांचे आत बेकायदेशीर केलेले अतिक्रमण स्वताहून काढून घ्यावे अन्यथा आपल्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल व पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्यात येईल असे नोटीसीद्वारे सुचित करण्यात आले आहे.
या अतिक्रमण धारकांमध्ये, पंडित शेषराव पाटील, प्रताप वसंतराव मोगरे, गजानन कडूबा सरोदे, कौतीक शिवराम पाटील, बाबुलाल मोतीराम, बाबु पिरण खाटीक, नाना वसंत मोगरे, प्रसाद श्रीकृष्ण शिंपी, फकिरा निर्मल, वहिद खाटीक, रऊफ खाटीक, शरद न्हावी, राजु शामतात्या लोहार, नामदेव माळी, नंदू शेषराव पाटील, सुदाम निंबाळकर, विजय लोहार, अभिमान, सचिन माळी (गॅरेज), संतोष सुतार, उखर्डू चौधरी, लक्ष्मणराव दुधे, जिभाऊ न्हावी, संतोष दाटे, अनिस, गजानन दोडके व इतर काही अतिक्रमण धारकांचा समावेश असून या सर्व अतिक्रमण धारकांना नोटीस बजावण्यात आली आहे.
***************************************************************
“कुऱ्हाड खुर्द बसस्थानक परिसरातील अतिक्रमण काढण्यासाठी ग्रामपंचायतीने अतिक्रमण धारकांना दालेल्या नोटीस ही प्रेमपत्र ठरु नये”
***************************************************************
असे असले तरी मात्र अतिक्रमण धारक अतिक्रमण काढण्यात येऊ नये म्हणून कुठेतरी आश्रय मिळवून अतिक्रमण कसे थांबवता येईल याकरिता अतिक्रमण धारक प्रयत्नशील असल्याची चर्चा कुऱ्हाड गावातून ऐकावयास मिळत आहे. तसेच मागील काळात कुऱ्हाड खुर्द ग्रामपंचायतीने या अगोदरही अतिक्रमण काढण्यासाठी तीन वेळा नोटीसा बजावण्यात आल्या होत्या मात्र नोटीसा मिळाल्यानंतरही अतिक्रमण धारकांनी अतिक्रमण काढण्यासाठी वारंवार अडथळा निर्माण केला होता म्हणून आता सरतेशेवटी कुऱ्हाड खुर्द ग्रामपंचायतीने मा. न्यायालयात जाऊन अतिक्रमण काढण्यासाठी रितसर मान्यता मिळवून घेत आज पुन्हा अतिक्रमण धारकांना नोटीसा बजावल्या आहेत.
मात्र आता जर का अतिक्रमण काढण्यासाठी दिरंगाई झाली तर भविष्यात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी लवकर आचारसंहिता लागू होणार असल्याचे संकेत मिळत असल्यानेच कुऱ्हाड ग्रामपंचायतीने कुठेही वेळ वाया न घालवता आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच अतिक्रमण निर्मूलन करण्यासाठी कारवाई करावी अशी मागणी केली असून “कुऱ्हाड खुर्द बसस्थानक परिसरातील अतिक्रमण काढण्यासाठी ग्रामपंचायतीने अतिक्रमण धारकांना दालेल्या नोटीस ही प्रेमपत्र ठरु नये” अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.