पाचोरा येथे महाविकास आघाडीतर्फे उद्या राजकोट येथील घटनेच्या निषेधार्थ आंदोलन.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०१/०९/२०२४
कोकणातील राजकोट किल्ल्यावर आठ महिन्यांपूर्वी उभारण्यात आलेला श्री. छत्रपती शिवाजी महाराजां पुतळा पडल्याने पुतळ्याची विटंबना झाली या घटनेबाबत संपूर्ण देशातील शिवप्रेमींमध्ये तिव्र संताप व्यक्त केला जात असून याचा निषेध नोंदवण्यासाठी
संपूर्ण महाराष्ट्रातून ठिकठिकाणी निषेध आंद करण्यात येत आहेत.
म्हणून महाविकास आघाडीच्या माध्यमातून या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी काल दिनांक ०२ सप्टेंबर २०२४ सोमवार रोजी सकाळी साडे दहा वाजता पाचोरा तालुक्यातील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या वतीने श्री. छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोडो मारो आंदोलन करण्यात येणार असल्याचे आज पाचोरा येथील शासकीय विश्रामगृहात घेण्यात आलेल्या बैठकीत ठरविण्यात आले असून या आंदोलनात महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जास्तीत, जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
या बैठकीत राष्ट्रीय कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष मा. श्री. सचिन सोमवंशी, उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेचे तालुकाध्यक्ष मा. श्री. शरद पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मा. अझहर खान, विधानसभा संघटक मा. श्री. नितीन तावडे, उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेचे शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष मा. श्री. अरुण पाटील, माजी उपजिल्हाप्रमुख ॲड. मा. श्री. अभय पाटील, पाचोरा शहरप्रमुख मा. श्री. अनिल सावंत, युवासेना तालुकाप्रमुख मा. श्री. शशी पाटील, मनोज चौधरी, ज्ञानेश्वर चौधरी, अभिषेक खंडेलवाल, निखिल सोनवणे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष मा. श्री. कल्पेश येवले उपस्थित होते.