२९ ऑगस्ट गुरुवार रोजी पाचोरा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे खान्देश विभागीय अधिवेशन.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/०८/२०२४
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने आपणांस कळविण्यात आनंद होत आहे की, २९ ऑगस्ट २०२४ गुरुवार रोजी विभागीय अधिवेशन व पत्रकारांना मोफत ट्रॅक सूट व विमा वितरण वाटप करीत आहोत. पत्रकार रात्रंदिवस बातमी संकलन करण्यासाठी जोखीम पत्करून बाहेर पडतात, सध्या पावसाळा सुरु असल्याने त्यांच्या कामात व्यत्यय येतो प्रकृती संबंधीत आजार उद्भवतात यांचा विचार करुन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे एक छोटीशी मदत म्हणुन वितरण सोहळा आयोजीत करण्यात येत आहे.
सन २०२३ या गेल्या वर्षात राज्य मराठी पत्रकार संघाकडून पत्रकारांना मोफत रेनकोट व छत्री वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला होता. त्याप्रमाणे या वर्षी देखील नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा आमचा मानस असुन ग्रामीण पत्रकारांना मोफत अपघात विम्याचे वितरण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर उद्योग क्षेत्रात व पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या उद्योजकांसह पत्रकारांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई, राज्यातील सर्वाधिक सभासद संख्या असलेली क्रियाशील संघटना आहे. प्रदेशाध्यक्ष मा. श्री. वसंतराव मुंढे, राज्य संघटक मा. श्री. संजय भोकरे, राज्य सरचिटणीस मा. श्री. डॉ. विश्वासराव आरोटे, राज्य कार्याध्यक्ष प्रवीणजी सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली संघटना राज्यभर अश्वगतिने काम करीत आहे. अतिशय उपक्रमशील पत्रकार संघटना म्हणुन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा नावलौकिक आहे. म. रा. म. पत्रकार संघ आयोजीत जळगांव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांकरीता पत्रकारांसाठी मोफत ट्रॅक सूट व विमा वाटप करीत आहोत. म्हणून या कार्यक्रमाला आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. तरी आपण उपस्थित राहुन आम्हाला उपकृत करावे अशी विनंती आयोजकांमार्फत करण्यात आली आहे.
या कार्यक्रमला अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा. ना. एकनाथरावजी शिंदे हे लाभले असून या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. गुलाबरावजी पाटील यांच्या शुभहस्ते होणार असून मदत व महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मा. ना. अनिलदादा पाटील यांच्या शुभहस्ते पत्रकारांसाठीच्या विमा पॉलिसीचे वितरण व महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकासमंत्री मा. ना. गिरीषभाऊ महाजन व अभिनेते तथा शिरुर लोकसभेचे खासदार मा. ना. अमोलजी कोल्हे यांच्या शुभहस्ते ट्रॅक सूट वितरण करण्यात येणार असून या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष पाचोरा, भडगाव तालुक्याचे लाडके आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील हे उपस्थित राहणार आहेत.
या विशेष कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. वसंतराव मुंडे, राज्य संघटक श्री. संजयजी भोकरे, प्रदेश सरचिटणीस डॉ. श्री. विश्वासराव आरोटे, राज्य प्रसिध्दी प्रमुख श्री. नवनाथ जाधव, राज्य कार्याध्यक्ष मा. श्री. प्रवीण सपकाळे, श्री. संतोष नवले, प्रा. सी. एन. चौधरी, प्रा. शिवाजी शिंदे, श्री. गणेश रावळ, श्री. अनिल आबा येवले, श्री. सुनील पाटील, श्री. गजानन जोशी, श्री. विनोद कोळी, श्री. महेश कौडिण्य, श्री. सचिन गोसावी, श्री. योगेश चौधरी, श्री. भगवान मराठे, श्री. भुषण महाजन यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
तसेच यावेळी पाचोरा, भडगाव तालुक्याचे लाडके आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील, पाचोराचे प्रांताधिकारी मा. श्री. भुषण अहिरे, पोलीस उपविभागीय अधिकारी मा. श्री. धनंजय वेरुळे, मुंबईचे उद्योजक मा. श्री. संजयजी अग्रवाल, पाचोरा नगरीचे उद्योजक मा. श्री. संतोष पाटील, मा. श्री. जयवंतराव पाटील, गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्ट मा. श्री. अनिकेत सुर्यवंशी यांना विधानसभा रत्न पुरस्कार, एस. एस. पी. गृप मा. श्री. शांताराम पाटील, लक्ष्मी कन्स्ट्रक्शन मा. श्री. संजय कुमावत, समाजसेवक मा. श्री. किशोर बारावरकर, विध्नहर्ता मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल पाचोरा संचालक डॉ. मा. श्री. सागरदादा गरुड, सामाजिक कार्यकर्त्या मा. सौ. ललिताताई पाटील यांना जिवन गौरव पुरस्कार, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचपुरा येथील मुख्याध्यापक मा. श्री. सुभाष देसले, शिंदे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी पाचोराचे प्राचार्य मा. श्री. डॉ. मनोज पाटील, नर्मदा मेडिकल फाउंडेशन अमळनेरचे संचालक मा. श्री. डॉ. अनिल शिंदे व धनदाई महाविद्यालय अमळनेरचे चेअरमन मा. श्री. के. डी. पाटील यांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
तरी सर्व पत्रकार बांधवांनी या कार्यक्रमाला दिनांक २९ ऑगस्ट २०२४ गुरुवार रोजी सकाळी अकरा वाजता स्वामी लॉन्स भडगाव रोड पाचोरा येथे उपस्थित रहावे असे आवाहन या कार्यक्रमाचे आयोजक खान्देश विभागीय अध्यक्ष मा. श्री. किशोर रायसाकडा, खान्देश विभागीय कार्याध्यक्ष मा. श्री. अबरार मिर्झा, खान्देश विभागीय उपाध्यक्ष मा. श्री. भुवनेश दुसाने खान्देश विभागीय संपर्क प्रमुख मा. श्री. राकेश सुतार, विभागीय सचिव मा. श्री. बाळासाहेब पाटील, विभागीय उपाध्यक्ष मा. श्री. विजय गाडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष मा. श्री. नागराज पाटील, भडगाव तालुकाध्यक्ष मा. श्री. अशोक परदेशी, पाचोरा तालुका अध्यक्ष मा. श्री. प्रवीण ब्राम्हणे, चाळीसगाव तालुकाध्यक्ष मा. श्री. गफ्फार मलीक, पारोळा तालुकाध्यक्ष मा. श्री. अभय पाटील, अमळनेर तालुकाध्यक्ष मा. श्री. समाधान मैराळे, पत्रकार हल्ला कृती समितीचे पाचोरा तालुकाध्यक्ष मा. श्री. नितीन पाटील यांनी केले आहे.