सध्याचा काळ डिजिटल मिडियाचा, पत्रकार तुकाराम गोडसे.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०३/०८/२०२४
दौंड व हवेली तालुक्यातील प्रिंट व डिजिटल मिडिया महाराष्ट्र राज्य संघटनेची सुसंवाद बैठक लोणी काळभोर येथील रामधरा सात्विक हॅली रिसॉर्ट येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या बैठकीत मध्ये प्रामुख्याने संघटनेची आगामी काळातील ध्येयधोरणे ठरवून संघटनेतील सभासदांसाठी तसेच त्यांच्या पाल्यांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवणे, संघटन मजबूत ठेवणे, या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
तसेच सभासदांनी ऐनवेळी उपस्थित केलेल्या विषयावर व सुचेना विचारात घेऊन त्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच सद्यस्थितीत प्रसारमाध्यमे कमालीचे बदल होत असून प्रिंट मीडिया पासून सुरु झालेल्या प्रसारमाध्यमांनी आता पोर्टल, युट्यूब अशा वेगवेगळ्या प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक पद्धतीने आपले काम सुरु केले आहेत. परंतु हे काम करत असतांनाच येणाऱ्या विविध अडचणी व त्यावर उपाय शोधण्यासाठी सविस्तर चर्चा करुन येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत वृत्तांकन करतांना काय काळजी घ्यावी याबाबत अनुभवी पत्रकारांनी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच संघटनेचे जिल्हा समन्वयक मा. श्री. तुकाराम गोडसे यांच्या महाराष्ट्र खबर न्यूज युट्यूबला सिल्व्हर बटन मिळाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी तुकाराम गोडसे यांनी यूट्यूब चॅनल सुरू करून चांगल्या पद्धतीने कसे चालवावे या बाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या सुसंवाद बैठकीत जिल्ह्याचे समन्वयक महाराष्ट्र खबर न्यूजचे मुख्य संपादक मा. श्री. तुकाराम गोडसे यांनी त्यांच्या सन २०१३ पासून पत्रकारिता करत असतांना आलेल्या बरेवाईट प्रसंगाची उदाहरणे देत सध्याच्या परिस्थितीत प्रसारमाध्यमांमध्ये कमालीचे बदल होत असून आता मिडीयाची क्रेझ वाढत चालली असून डिजिटल मिडियाच्या माध्यमातून तसेच युट्यूबच्या माध्यमातून पत्रकारिता करतांना येणाऱ्या अडचणी यावर सविस्तर माहिती देत अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.
तसेच कोणतीही बातमी देतांना बातमी लवकर कुणाची लागते याची स्पर्धा न करता बातमी कुणाची चांगल्याप्रकारे लागते याची स्पर्धा केली पाहिजे. तसेच शब्द हे शस्त्र असून पत्रकाराची लेखणी ही दुधारी तलवार आहे. म्हणून आपल्या काही चुकांमुळे एखाद्याचे आयुष्य बर्बाद होऊ शकते याचे भान ठेवून गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी समाजाभिमुख वृत्तांकन करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
या सुसंवाद बैठकीला अध्यक्ष सुनील जगताप, जिल्हाध्यक्ष बापू काळभोर, सचिव संदीप बोडके, खजिनदार विजय काळभोर, सल्लागार तुळशीराम घुसाळकर, जिल्हा समन्वयक तुकाराम गोडसे, चंद्रकांत दुंडे, जितेंद्र आव्हाळे, अमोल भोसले, रियाज शेख, अमोल अडांगळे, गौरव कवडे तर दौंड तालुक्यातील संघटनेचे पदाधिकारी सचिव राहुलकुमार अवचट, कार्याध्यक्ष मनोजकुमार कांबळे, उपाध्यक्ष संदीप भालेराव, विलास कांबळे, मुख्य प्रतोद संतोष जगताप, संघटक मिलिंद शेंडगे, सदस्य सोनबा ढमे, नेताजी खराडे, सतीश गायकवाड उपस्थित होते. अल्पोपहार व चहापाणी करून या सुसंवाद बैठकीचा समारोप करण्यात आला.