सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • संस्थाचालकाचा पैसे कमावण्यावर डोळा, लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शाळा.

  • बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ, जिल्हाधिकारी व वैद्यकीय विभागाकडून कारवाई अपेक्षित.

  • ब्लॅक आऊट व मॉक ड्रिलच्या कालावधीत डी. जे. व शारपी लाईटचा धिंगाणा, डिजे मालकांवर कठोर कारवाईची मागणी.

  • सार्वे प्र. लो. शिवारातुन पन्नास हजार रुपये किंमतीच्या बैलाची चोरी.

  • बिबट्याचा हल्ल्यात एक मजूर जखमी, अंबे वडगाव ते पाचोरा रस्त्याच्या कामावरील मजूरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर.

ब्रेकिंग न्यूज
Home›ब्रेकिंग न्यूज›ग्रामविकास माध्यमिक विद्यालयाच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापकांनी दाखवली खुबी, महत्वाचे कागदपत्रे असलेल्या कपाटाची लांबवली चावी.

ग्रामविकास माध्यमिक विद्यालयाच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापकांनी दाखवली खुबी, महत्वाचे कागदपत्रे असलेल्या कपाटाची लांबवली चावी.

By Satyajeet News
July 2, 2024
0
0
Share:
Post Views: 998
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/०७/२०२४

पाचोरा तालुक्यातील बऱ्याचशा खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये अनागोंदी कारभार सुरु असून या अनागोंदी कारभारामुळे सर्वसामान्य कुटुंबातील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना अनेक अडिअडचणींना सामोरे जावे लागत असून बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊन गुणवत्तेवर परिणाम होत असल्याने पालक वर्गातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

अशीच एक घटना आज पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील ग्रामविकास माध्यमिक विद्यालयात घडली असून दिनांक ३० जून २०२४ रविवार रोजी नुकतेच सेवानिवृत्त झालेले मुख्याध्यापक प्रमोद महाजन यांनी सेवानिवृत्त झाल्यानंतर ग्रामविकास माध्यमिक विद्यालयाचे सर्व कागदपत्रे, सेवा पुस्तके व इतर महत्त्वाची कागदपत्रे व जबाबदारी नवनियुक्त मुख्याध्यापक मा. श्री. पुंडलिक जगन्नाथ तेली यांच्याकडे देणे गरजेचे व नियमानुसार क्रमप्राप्त असल्यावरही सेवानिवृत्त त्यांनी संस्थेकडे त्यांचे ९३०००/०० हजार रुपये घेणे असल्याच्या वैयक्तिक वादविवादातून मनमानी कारभार करत लिपिक कार्यालयाला व महत्त्वाचे कागदपत्रे असलेले ड्रावर व कपाटाच्या चाव्या नवनियुक्त मुख्याध्यापकांकडे सुपुर्द न करता घरी निघून गेल्यामुळे विद्यालयाच्या कामकाजात अडथळा निर्माण झाला आहे.

विशेष बाब म्हणजे नुकतेच इयत्ता दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शाळा सोडल्याचा दाखला व गुणपत्रक अत्यंत गरजेचे आहे. कारण या नुकत्याच उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कॉलेज, वेगवेगळे डिग्री, डिप्लोमा कोर्स करण्यासाठी व
वेगवेगळ्या शिक्षणासाठी ठराविक वेळात प्रवेश घेणे अत्यंत गरजेचे असून संस्थेच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापकांच्या वैयक्तिक वादातून ऐनवेळी ग्रामविकास माध्यमिक विद्यालयातून कागदपत्रे न मिळाल्याने जवळपास पन्नास ते साठ विद्यार्थ्यांना आज दिनांक ०२ जूलै २०२४ मंगळवार रोजी खाली हात परत जावे लागले असल्याने गोरगरिबांच्या मुलांना नहाकच आर्थिक भुदंड व मानसिक ताण सहन करावा लागला आहे.

या सेवानिवृत्त मुख्याध्यापकांनी केलेल्या गैरवर्तणूकीमुळे विद्यार्थ्यांना जर वेळेवर कागदपत्रे मिळाली नाहीत तर त्याचे मोठे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून ग्रामविकास माध्यमिक विद्यालयाच्या आजच सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रमोद महाजन यांच्या विरोधात ग्रामविकास माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष मा. श्री. प्र. बा. पाटील संचालक मा. श्री. भास्कर पाटील, मा. श्री. जनार्दन देव, मा. श्री. कडूबा तेली, मा. श्री. सुरेश बडगुजर व मा. श्री. दिलीप जैन यांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला रितसर तक्रार दाखल केली असून या तक्रारीत त्यांनी सेवानिवृत्त मुख्याध्यापक मा. श्री. प्रमोद महाजन यांनी महत्त्वाची कागदपत्रे घेऊन गेले असावेत असा संशय व्यक्त केला आहे.

या तक्रारीची दखल घेत पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक
पोलीस निरीक्षक मा. श्री. चंद्रशेखर पालकर व त्यांचे सहकारी हे उद्या दिनांक ०३ जूलै २०२४ बुधवार रोजी ग्रामविकास माध्यमिक विद्यालय जाऊन सत्य परिस्थिती जाणून घेत रितसर पंचनामा करुन पुढील कारवाई करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
_______________________________________________________________
*सेवानिवृत्त मुख्याध्यापकांची शिरजोरी*
सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रमोद महाजन यांनी सत्यजित न्यूजचे संपादक दिलीप जैन यांना आपले बोलणे रेकॉर्ड होऊ नये म्हणून व्हाट्सअपच्या माध्यमातून व्हाइस कॉल करत तुम्ही आमची बातमी का लावली अशी रागाच्या भरात विचारणा करत हुज्जत घालण्याचा प्रयत्न करुन एकप्रकारे प्रसारमाध्यमांवर दबाव टाकण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे.
________________________________________________________________

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

सृष्टी सोनवणे हिने प्रि नेट परिक्षेत केले ...

Next Article

पाचोरा व जामनेर तालुक्यातील धर्मस्थळांवर बुवाबाजीला ऊत, ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • ब्रेकिंग न्यूज

    चिंचपुरे येथील सरपंच, उपसरपंचासह नऊ ग्रामपंचायत सदस्य अपात्र‌. बाळू पाटील यांच्या लढ्याला यश.

    February 16, 2023
    By Satyajeet News
  • ब्रेकिंग न्यूज

    आश्वासनाच्या ढगाळ वातावरणात, पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक मैदानावर पैशांचा पाऊस.

    April 27, 2023
    By Satyajeet News
  • ब्रेकिंग न्यूज

    वरसाडे येथील श्रीमती कळसाबाई शंकर पवार आश्रमशाळेतील महिला कर्मचाऱ्याच्या नशिबी १२ वर्षांनंतर वनवास.

    November 23, 2022
    By Satyajeet News
  • ब्रेकिंग न्यूज

    सार्वे प्र. लो. शिवारातुन पन्नास हजार रुपये किंमतीच्या बैलाची चोरी.

    May 9, 2025
    By Satyajeet News
  • ब्रेकिंग न्यूज

    पिंपळगाव हरेश्वर पोलीसांनी केली वॉश आऊट मोहीम सुरु.

    March 24, 2024
    By Satyajeet News
  • ब्रेकिंग न्यूज

    उद्या भरणारा वरखेडी येथील आठवडी बाजार बंदचे मा. जिल्हाधिकारी यांचे आदेश.

    September 27, 2023
    By Satyajeet News

You may interested

  • आपलं जळगाव

    वावडदा येथे कोरोनाबाबत नियमाचे पालन न केल्यास कारवाईचा इशारा.

  • राजकीय

    उठ ओबीसी जागा हो, एकतेचा धागा हो.पाचोर्‍यात ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपाचे चक्काजाम आंदोलन.

  • शैक्षणिक

    एस. एस. एम. एम. महाविद्यालय येथे नेहरू युवा केंद्र जळगावं व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने गहन स्वयंसेवक नोंदणी कार्यक्रम(IVEP) आणि CLEAN INDIA 2.0 अभियान कार्यक्रमाचे आयोजन.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज