श्रीमती अरुणा राठोड हिचा अकस्मात मृत्यू संशयाच्या भोवऱ्यात, सखोल चौकशीची सुज्ञ नागरिकांची मागणी.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०१/०७/२०२४
पाचोरा तालुक्यातील वडगाव आंबे तांडा नंबर दोन येथील माहेरवाशीण श्रीमती अरुणा खेमराज राठोड वय वर्षे अंदाजे ३० या महिलेचे परवा दिनांक २९ जून २०२४ शनिवार रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास वडगाव आंबे तांडा नंबर दोन येथील भगवान महादेव मंदिराच्या ओट्यावर अकस्मात निधन झाल्याची घटना घडली असून या घटनेबाबत पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असली तरी वडगाव आंबे, वडगाव आंबे खुर्द, वडगाव आंबे बुद्रुक व पंचक्रोशीतील गावागावात उलटसुलट चर्चा सुरु असल्याने हा अकस्मात मृत्यू आहे, आत्महत्या आहे की घातपात आहे याचा तपास होणे गरजेचे ठरले आहे.
कारण वडगाव आंबे तांडा नंबर दोन येथील माहेरवाशीण श्रीमती अरुणा खेमराज राठोड वय वर्षे अंदाजे ३० या महिलेचे १० वर्षांपूर्वी समाजाच्या रितीरिवाजाप्रमाणे लग्न झाले होते. लग्न झाल्यानंतर काही वर्षातच तिच्या पतीचे निधन झाले पतीच्या निधनानंतर श्रीमती अरुणा खेमराज राठोड ही महिला जळगाव येथे मिळेल ते काम करुन मोलमजुरी करत आपला उदरनिर्वाह चालवत होती.
मोलमजुरी करुन उदरनिर्वाह चालवत असतांना श्रीमती अरुणा राठोड ही अधुनमधून वडगाव आंबे येथे माहेरी येत असे काल दिनांक २९ जून २०२४ शनिवार रोजी श्रीमती अरुणा राठोड ही वडगाव आंबे तांडा नंबर दोन येथे माहेरी आली होती. ती तीच्या माहेरच्या घरी आल्यावर घरची मंडळी शेतात कामासाठी गेलेले असल्याने तिने शेतात जाऊन नातेवाईकांची भेट घेतली व नंतर वडगाव आंबे तांडा नंबर दोन येथील मंदिराकडे गेली होती परंतु यावेळी मंदिर परिसरात कुणीही नव्हते अशी माहिती समोर येत असून सायंकाळी काही तरुण व्यायाम करण्यासाठी मंदिर परिसरात गेले असता त्यांना एक महीला मंदिराच्या ओट्यावर झोपलेली दिसून आली.
इतक्या वेळपर्यंत ही महिला मंदिराच्या ओट्यावर कशी काय झोपली आहे ती कोण आहे हे बघण्यासाठी तरुणांनी महिलेजवळ जाऊन पाहिले असता संबंधित महिला ही आपल्याच तांड्यातील श्रीमती अरुणा राठोड असल्याची ओळख पटल्यावर त्यांनी त्या महिलेला उठवण्यासाठी प्रयत्न केला परंतु महिला प्रतिसाद देत नसल्याने त्यांनी तांड्यात जाऊन सविस्तर माहिती दिली. त्यामुळे तेव्हा जाणकार लोकांनी जाऊन पाहिले असता श्रीमती अरुणा राठोड ही बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्यावर त्या महिलेला लगेचच पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले होते परंतु रुग्णालयात जाण्याआधीच श्रीमती अरुणा राठोड हीचा मृत्यू झाला असल्याने संबंधित डॉक्टरांनी तीला मयत घोषित केले होते.
तदनंतर मयत श्रीमती अरुणा राठोड यांचा मृतदेह घरी आणून दुसऱ्यादिवशी अंत्यसंस्कार करण्याचे ठरले होते. मात्र मयत महिलेच्या तोंडाला फेस आला असल्याचे लक्षात आल्यानंतर तीच्या नातेवाईकांना संशय आला कारण श्रीमती अरुणा राठोड ही जळगाव येथून प्रवास करत वडगाव आंबे बस स्थानकापासून तर वडगाव आंबे तांडा नंबर दोन पर्यंत जवळपास अर्धा किलोमीटर पायी चालत आली नंतर तीने तांड्यात फिरुन जवळपासच्या ओळखीच्या लोकांच्या भेटीगाठी घेऊन मंदिराकडे गेली व लगेचच ती संध्याकाळ बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्यावर पाचोरा येथे ग्रामीण रुग्णालयात नेत असतांनाच मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर मयत अरुणा राठोड हिच्या मृत्यूबाबत संशय निर्माण झाला होता.
याच कालावधीत मयत अरुणा राठोड हिच्या बाहेरगावी राहणाऱ्या जवळच्या नातेवाईकांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे भ्रमणध्वनीवर संपर्क साधुन संबंधित मयत अरुणा राठोड हिच्या मृत्यूबाबत संशय असल्याने तीचे शवविच्छेदन करण्यात यावे अशी मागणी केली होती. नातेवाईकांनी केलेल्या मागणीनुसार दिनांक ३० जून २०२४ रविवार रोजी मयत अरुणा राठोड हिचे शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्यानंतर मयत अरुणा राठोड हिच्यावर वडगाव आंबे तांडा नंबर दोन येते अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
मात्र या घटनेबाबत वडगाव आंबे, वडगाव आंबे खुर्द, वडगाव आंबे बुद्रुक व पंचक्रोशीतील गावागावात सुरु असलेल्या उलटसुलट चर्चेला उधाण आले असतांनाच वडगाव आंबे तांडा नंबर दोन येथील ज्या भगवान महादेव मंदिराच्या ओट्यावर अरुणा राठोड ही बेशुद्ध अवस्थेत आढळून आली होती त्या मंदिरात वास्तव्यास असलेल्या पुजारी बाबाला मयत मुलीच्या नातेवाईकांनी आज दिनांक ०१ जूलै २०२४ सोमवार रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास वडगाव आंबे गाव ते वडगाव आंबे तांडा दरम्यान रस्त्यावर अडवून जबर मारहाण केली यावेळी आसपासच्या लोकांनी मध्यस्थी करुन त्या पुजारी बाबाला तेथुन जायला सांगितल्याने पुढील अनर्थ टळला होता.
परंतु मयत अरुणा राठोड हिचा झालेला अकस्मात मृत्यू व त्यानंतर लगेचच मंदिराच्या पुजारी बाबाला मयत अरुणा राठोड हिच्या नातेवाईकांनी केलेली मारठोक मारठोक करण्यामागचे कारण काय व पंचक्रोशीतील गावागावात सुरु असलेली उलटसुलट चर्चा यामुळे मयत अरुणा राठोड हिच्या मृत्यूचे गुढ वाढले असून अरुणा राठोड हिचा अकस्मात मृत्यू झाला आहे, तीने आत्महत्या आहे की तीचा घातपात करण्यात आला आहे याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून अरुणा राठोड हिच्या मृत्यूबाबत सखोल चौकशी होणे अत्यंत गरजेचे आहे असे मत पंचक्रोशीतील गावागावातील सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केले आहे.