पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे यांची अवैध धंद्यावर धडक कारवाई.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२१/०६/२०२४
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन असून या पोलीस स्टेशन अंतर्गत जवळपास ४९ गावांचा समावेश कसून या पोलीस स्टेशनच्या कक्षेत दुरक्षेत्र लोहारा पोलीस चौकी आहे. या पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व खेड्यांची भौगोलिक परिस्थिती पहाता रस्त्यांची समस्या बिकट असल्याने पोलीसांना अती महत्वाच्या प्रसंगी घटनास्थळी जातांना खुपच धावपळ करत तारेवरची कसरत करावी लागते.
असे असले तरी दोन महिन्यांपूर्वी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. महेद्रजी वाघमारे यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी नव्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून मा. श्री. प्रकाश काळे यांनी पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी सुरवातीला आठ दिवसांत सहकाऱ्यांसह कडून पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन व परिसराची माहिती जाणून घेतली. व लगेच अवैध धंद्याच्या विरोधात वॉश आऊट मोहीम सुरु केली आहे.
या वॉश आऊट मोहीमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. प्रकाश काळे साहेबांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मा. श्री. महेश्वर रेड्डी, उपविभागीय अधिकारी मा. श्री. धनंजय वेरुळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मा. श्री. अमोल पवार, आर. के. पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल रणजित दादा पाटील, किरण ब्राह्मणे, रविंद्र पाटील, अरुण भाऊ राजपूत, अभिजित निकम, जितेंद्र पाटील या सर्व सहकारी पोलीसांना सोबत सट्टा, पत्ता, जुगार व गावठी दारुची निर्मिती व विक्री करणाऱ्यांवर धाडसत्र राबवून मागील दोन महिन्यांपासून रात्रंदिवस सळो की पळो करुन सोडले आहे.
या कारवाईत मागील दोन महिण्यात तीस ते पस्तीस गावठी दारु निर्मितीच्या भट्ट्यावर धाडसत्र राबवून हजारो रुपयांचे कच्चे व पक्के रसायन नष्ट करत हजारो रुपयांची तयार दारु नष्ट केरत हातभट्ट्या नष्ट केल्या असून दहा जणांवर कायदेशीर कारवाई करत गुन्हे दाखल केले आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी पदभार स्वीकारल्यापासून गावागावांतील पोलीस पाटील, सरपंच, पत्रकार, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते यांच्याशी संपर्क वाढवून एकमेकांना सहकार्याची भूमिका घेत दोन नंबर वाल्यांना सळो की पळो करुन सोडले आहे.
या त्यांच्या कार्याची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक मा. श्री. महेश्वर रेड्डी यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. प्रकाश काळे साहेब व त्यांच्या सहकाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.