नराधमाला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी करत, जमावाने केली जामनेर पोलीस स्टेशनवर दगडफेक.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२१/०६/२०२४
जामनेर तालुक्यातील केकतनिंभोरा शिवारातील चिंचखेडा गावठाण हद्दीत काही आदिवासी कुटुंब रहातात हे मोलमजुरी करणारे कुटुंब असल्याने आता पेरणीचे दिवस सुरु असल्याने सहा वर्षीय अल्पवयीन मुलीला घरी सोडून मुलीचे आईवडील कामानिमित्ताने दुसरीकडे गेले होते. मुलगी घरी एकटीच असल्याचा फायदा घेत शेजारीच रहात असलेल्या एका पंचवीस वर्षीय नराधमाने त्या अल्पवयीन मुलीला तुला खायला खाऊ घेऊन देतो असे सांगून सोबत घेऊन गेला व दुकानातून काही खायची वस्तू घेऊन त्या मुलीला गोड बोलून चिंचखेडा बुद्रुक गावाजवळील एका केळीच्या मळ्यात नेऊन तिच्यावर अमानुषपणे अत्याचार करुन नंतर तीला जीवे ठार मारुन पुरावे नष्ट केल्याची घटना काल दिनांक ११ जून २०२४ मंगळवार रोजी सायंकाळी सात वाजता उघडकीस आली होती. या घटनेनंतर संशयित आरोपी फरार झाला होता.
घटना घडल्या पासून नऊ दिवस उलटले तरीही नराधम आरोपीला अटक करण्यात आली नसल्याने जामनेर तालुक्यासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात असंतोष निर्माण झाला होता. याच कालावधीत मिळालेल्या गुप्त माहितीवरुन काल दिनांक २० जून २०२४ गुरुवार रोजी जळगाव गुन्हा शाखा व भुसावळ पोलीसांनी तापी नदीच्या जवळ असलेल्या दुग्ग्याची देवी मंदिराजवळ शिताफीने ताब्यात घेत अगोदर भुसावळ पोलीस स्टेशनला नेत जळगाव येथे वैद्यकीय तपासणी करुन रात्री जामनेर पोलीस स्टेशनला आणले होते.
ही माहिती मिळताच जामनेर शहरात मोठा जमाव जमला. त्यांनी नराधमाला आमच्या ताब्यात द्या, किंवा भरचौकात फाशी द्या अशी मागणी करत टायर जाळले, महामार्ग रोखला, तसेच जामनेर पोलीस स्टेशनवर हल्लाबोल करत दगडफेक करत प्रचंड तोडफोड केली. यात पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्यासह दहा ते बारा पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची घटना काल दिनांक २० जून २०२४ रोजी रात्री घडली घडली होती.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक मा. महेश्वर रेड्डी हे रात्री अकरा वाजेच्या सुमारास दंगा नियंत्रण पथक व आपल्या ताफ्यासह दाखल झाले त्यांनी परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी खूप प्रयत्न केला मात्र परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला तरीही जमाव शांत होत नसल्याचे पाहून सरतेशेवटी हवेत १० ते १२ फैरी झाडल्यावर परिस्थिती आटोक्यात आली. असून जामनेर शहरात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली आहे.
या संतप्त जमावाच्या दगडफेकीत पोलीस निरीक्षक मा. किरण शिंदे त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी हितेश महाजन, कुंभार, सुनील राठोड, आर। एस. कुमावत, संजय खंडारे, प्रितम बारकाले हे जखमी झाले असून जिल्हा पोलीस अधीक्षक मा. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक मा. अशोक नखाते, गुन्हा शाखेचे वरिष्ठ निरीक्षक मा. बबनराव आव्हाड, पाचोरा उप विभागीय पोलीस अधिकारी मा. धनंजय वेरुळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे व त्यांचे सहकारी करत असून जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. किरण शिंदे व त्यांचे सहकारी परिस्थितीवर लक्ष्य ठेवून आहेत.