जळगाव लोकसभा मतदारसंघात मतदारांचा एकच वादा, निवडून आणू करण दादा.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/०४/२०२४
जळगाव लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार करण बाळासाहेब पाटील यांच्या पाचोरा तालुक्यातील प्रचाराला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून वैशालीताई सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तनाचा जागर व मशालचा गजर होत असल्याचे दिसून आले आहे.
पाचोरा, भडगाव मतदारसंघातील प्रचारास प्रारंभ झाला असून त्यांच्यासाठी शिवसेना, उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांनी महाविकास आघाडीच्या प्रचाराची धुरा सांभाळत गावोगावी गल्लीबोळात जाऊन प्रचार सुरू केला आहे. या प्रचाराला पाचोरा तालुक्यातील जनतेने अतिशय जोरदार असा प्रतिसाद दिला आहे.
नुकतेच महाविकास आघाडीचे उमेदवार करण बाळासाहेब पाटील यांच्यासाठी कडे वडगाव, शिंदाड, गहुले, सातगाव आणि सातगाव तांडा येथे प्रचार फेरी काढण्यात आली. यात प्रत्येक गावात प्रचार फेरीच्या माध्यमातून देशाच्या भवितव्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मत देण्याचे आवाहन करण्यात आले. सर्वत्र परिवर्तनाची लाट दिसून येत असून जळगावात देखील परिवर्तन होणारच अशी ग्वाही याप्रसंगी अनेक मतदारांनी प्रचार फेरीतील मान्यवरांना दिली. मशाल या चिन्हावर मतदार करुन आम्ही करण दादा पवार यांना बहुमताने निवडून आणू अशी शपथ वैशालीताई सुर्यवंशी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे.
या प्रचार फेरीत शिवसेना, उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांच्यासह शेतकरी सेना उपजिल्हा प्रमुख अरूण पाटील, शरद पाटील, उपजिल्हाप्रमुख ॲड. अभय पाटील, अजय देवरे, हिलाल दादा, विकास पाटील, राकेश सुतार, हरीभाऊ पाटील, संतोष पाटील, योजना पाटील, पुष्पा परदेशी, जयश्री येवले, उषा परदेशी, अनिता पाटील, रसूल भाई, राकेश सोनवणे, ज्ञानेश्वर चौधरी, कडे वडगाव येथील रवी पाटील, शिंदाड येथील अरूण तांबे, आनंदा चौधरी, हिलाल पाटील, गोपीचंद कोळी, संदीप जैन, दीपक मुळे, प्रकाश एकनाथ, गणेश मुळे आदी मान्यवर सहभागी झाले होते.