आश्वासनाच्या ढगाळ वातावरणात, पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक मैदानावर पैशांचा पाऊस.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/०४/२०२३

सद्यस्थितीत मानवाच्या मनमानीमुळे निसर्गाचा झपाट्याने ऱ्हास होत असल्याने निसर्गातही कमालीचा बदल झाला असल्याने पावसाळ्यात उन्हाळा व उन्हाळ्यात पावसाळा असे चक्र सुरु झाले आहे. याचाच परिणाम मानवावर झाला की काय म्हणून माणसाच्या वर्तनही झपाट्याने बदल होत आहेत.

पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या निवडणुकीत विद्यमान आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील यांचे शेतकरी विकास पॅनल कपबशी या निशाणीवर, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार मा. श्री. दिलीप भाऊ वाघ, उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या जेष्ठ नेत्या सौ. वैशालीताई सुर्यवंशी व राष्ट्रीय काँग्रेसचे मा. श्री. सचिन सोमवंशी यांच्या महाविकास आघाडीचे वज्रमूठ पॅनल छत्री या निशाणीवर व मा. श्री. अमोल भाऊ शिंदे हे एकेला चलो म्हणत शेतकरी सहकार पॅनलच्या माध्यमातून शिट्टी या निशाणीवर निवडणूक लढवत आहेत.

या तिघही मातब्बर नेत्यांनी या निवडणुकीत आपलाच विजय झाला पाहिजे म्हणून काम, दाम, दंड, भेद या सगळ्या बळाचा वापर करुन विजयी होण्यासाठी कंबर कसली असून त्याप्रमाणे कंबर कसली असल्याचे दिसून येत आहे. दिनांक २० एप्रिल २०२३ गुरुवार रोजी माघारीची तारीख झाल्यावर तिघांचेही उमेदवार निश्चित झाल्यानंतर तिघांनीही प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे.

याच प्रचारादरम्यान तिघही पॅनल कडून आपली प्रतिष्ठा पणाला लावून जास्तीत, जास्त लोकांना आकर्षित करण्यासाठी व सद्यस्थितीत मतदान आपल्याकडे ओढून घेण्यासाठी मतदारांच्या बदलत्या मानसिकते नुसार म्हणजे “ज्याच खाईल मटन त्याचच दाबेल बटन” अशी पध्दत सुरु झाली असल्याने (जे मतदार या मानसिकतेत बसत नसतील त्यांनी मनाला लावून घेऊ नये ही विनंती) तिघही पॅनल कडून बोकडाचे बळी देत आपली फळी मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले गेले हो विशेष म्हणजे शाकाहारी लोकांसाठी शेवभाजीच्या शुध्द शाकाहारी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. विशेष म्हणजे या जेवणावळीच्या पंक्तीत “जिकडे मांडव, तिकडे तांडव” म्हणजे (नाच) करणारे बरेचसे चेहरे तिघही मंडपात दिसून आले हे विशेष.

जसजशी मतदानाची तारीख जवळ येत होती तसतशी मतदारांची वाढती मागणी व आपेक्षा पाहून तिघही पॅनल प्रमुख व उमेदवारांनी मतदारांना विविध आश्वासनं देत आपल्याकडे वळवून घेण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. व आता ग्रामपंचायत सदस्य व विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे सदस्य यांच्यासाठी ठराविक रकमेची पाकीटे घरपोच देण्यासाठी कार्यकर्ते कामाला लागले असून काही मतदारांना अज्ञातस्थळी नेण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

म्हणून आजपर्यंत तिघही पॅनल कडून दिलेली मेजवानी व दिलेल्या आश्वासनानुसार आज रात्री पैशाचा पाऊस पडणार असल्याचे खात्रीलायक वृत्त असून सगळीकडे आनंदीआनंद दिसून येत आहे. तसेच तिघही पॅनल प्रमुखांनी सगळ्यांचे पैसे घ्या मात्र मदतान आम्हालाच करा असा जाहीर फतवा काढला असल्याने मतदार सगळ्यांचेच पैसे घेणार आहेत हे मात्र निश्चित परंतु मतदान कुणाकडे जाईल हे मतमोजणी नंतर सिध्द होईल तोपर्यंत शांती शांती

ब्रेकिंग बातम्या