जळगाव शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदी ऊध्दव भाऊ मराठे.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०४/०१/२०२३
शिवसेना (ऊध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख मा. श्री. उध्दव ठाकरे साहेब यांच्या आदेशावरून जळगाव जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या नुकत्याच जाहीर करण्यात आल्या आहेत. या नियुक्त्या मध्ये पाचोरा, भडगाव तालुक्यातील कार्यक्षेत्रातील नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून यात शिवसेनेचे कट्टर समर्थक मा. श्री. उध्दव भाऊ मराठे यांची उपजिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
उध्दव भाऊ मराठे यांची उपजिल्हाप्रमुख पदी निवड झाल्यानंतर पाचोरा, भडगाव तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. या निवडीबद्दल या. श्री. दिपक भाऊ राजपूत यांनी मा. श्री. उध्दव भाऊ मराठे यांचे शाल, पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
तसेच पाचोरा, भडगाव कार्यक्षेत्रातील मा. श्री. शरद पाटील.(तालुकाप्रमुख), मा. श्री. विनोद बाविस्कर.(उपजिल्हा संघटक), मा. श्री. धर्मराज पाटील.(उपजिल्हा समन्वयक), मा. श्री. देविदास पाटील.(तालुका संघटक), मा. श्री. ज्ञानेश्वर पाटील.(तालुका समन्वयक), ॲड. मा. श्री. दिपक पाटील.(शहरप्रमुख), अनिल सावंत.(शहरप्रमुख), मा. श्री. दत्ताभाऊ जडे.(शहर संघटक), मा. श्री. राजेंद्र राणा.(शहर संघटक), मा. श्री. दादाभाऊ चौधरी.(शहर समन्वयक), मा.श्री. बंडूभाऊ मोरे.(शहर समन्वयक) यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले जात आहे.