सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • पाचोरा तालुक्यात केमिकलयुक्त गावठी दारू, ताडीचा धुमाकूळ. आरोग्याशी खेळ, अकाली मृत्यू वाढले; कारवाईबाबत गंभीर प्रश्न.

  • भडगाव नगरपालिकेत राष्ट्रीय पक्षाच्या भामट्यांचा पर्दाफाश, निवडणूक रसद लंपास करणाऱ्या पदाधिकारी-उमेदवारांचा निर्लज्ज उद्योग उघड.

  • “शेतकरी अनुदानात मोठा घोळ! तहसीलदारांचा घुमजाव, प्रांताधिकाऱ्यांचे मौन; पाचोरा महसूल विभाग संशयाच्या भोवऱ्यात”

  • शालार्थ आयडी घोटाळा, एका आयडीसाठी ३ ते ५ लाखांचा दर; हजार आयडींचा २५ कोटींचा व्यवहार संशयात.

  • पाचोरा शहरासह तालुक्यात रासायनिक ताडीची खुलेआम विक्री; नागरिकांत तीव्र संताप.

Uncategorized
Home›कृषी विषयक›Uncategorized›शिंदाड येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न.

शिंदाड येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न.

By Satyajeet News
September 6, 2022
678
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०६/०९/२०२२

पाचोरा पंचायत समितीचे शिक्षण विभाग व समाज विकास विद्यालय, शिंदाड ता. पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २ सप्टेंबर २०२२ रोजी ४९ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनाचे उद्घाटन पाचोरा, भडगाव मतदार संघाचे आमदार मा. श्री. किशोर पाटील, माजी जिल्हापरिषद सदस्य सदस्य मा. श्री. मधुकर काटे, गटविकास अधिकारी अतुल पाटील, समाज विकास मंडळाचे अध्यक्ष प्रविण पाटील यांचे हस्ते करण्यात आले.

समाज विकास विद्यालय, शिंदाड येथे आयोजित करण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक विभागाच्या ४५ तर माध्यमिक विभागाचे ५५ विद्यार्थ्यांनी, प्राथमिक शिक्षक विभाग ५, तर माध्यमिक शिक्षक विभाग ५ अशा विज्ञान, तंत्रज्ञान, खेळ, गणिती मॉडेल, सोलर, प्रदूषण अशा विविध उपक्रमां संदर्भात प्रदर्शन मांडण्यात आले होते.

उद्घाटना प्रसंगी आपल्या मनोगतातुन आमदार किशोर पाटील यांनी मोबाईलचे दुष्परिणाम व फायदे तसेच विद्यार्थ्यांनी मन व मनगट मजबूत करणे तसेच आजचा विद्यार्थी हा भविष्याचा वैज्ञानिक आहे असे संबोधन करून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. सदर विज्ञान प्रदर्शनामध्ये प्राथमिक गटातून जे. जे. पंडित विद्यालय, लोहाराची विद्यार्थीनी समिक्षा शिवाजी क्षीरसागर तर माध्यमिक गटात समाज विकास विद्यालय, शिंदाड ची विद्यार्थीनी नंदिनी नामदेव परदेशी, अक्षदा उत्तम पाटील, यांनी प्रदर्शनात प्रथम क्रमांक पटकावला. तर प्राथमिक शिक्षक गटात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, राजुरी चे शिक्षक ज्ञानेश्वर तुकाराम पाटील तर माध्यमिक गटात येथील ए. टी. गुजराती कन्या शाळा, नगरदेवळा चे शिक्षक रविंद्र हिलाल सूर्यवंशी यांच्या उपक्रमास प्रथम क्रमांक प्राप्त झाला.

पाचोरा तहसिलदार कैलास चावडे, मंडळाचे अध्यक्ष प्रविण पाटील, गटशिक्षणाधिकारी नरेंद्र चौधरी यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. सदर विज्ञान प्रदर्शनास माजी पंचायत समिती सभापती सुभाष पाटील, विस्तार अधिकारी राजकुमार धस, सरपंच ज्ञानेश्वर तांबे, उपसरपंच नरेंद्र पाटील, चिटणीस विलास वाणी संचालक विकास पाटील, प्रताप लोधी, ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष देविदास पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी समाधान पाटील, विनायक ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य संदिप सराफ, स्वप्निल पाटील, धनराज पाटील, मुख्याध्यापक ए. पी. गव्हाले केंद्रप्रमुख, विविध शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेंद्र पाटील, प्रास्ताविक गट शिक्षणाधिकारी नरेंद्र चौधरी, तर आभार एस. यु. गोसावी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिंदाड विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 97
Previous Article

टक्केवारीच्या खेळात जबाबदार अधिकारी बिळात, गावागावांतील विकास ...

Next Article

साधा ग्रामपंचायत सदस्य नसलेला माणूस मुख्यमंत्री होणे ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorized

    भारतीय जैन संघटनेच्या विभागीय उपाध्यक्षपदी मा. श्री. लतीश जैन यांची निवड.

    February 7, 2023
    By Satyajeet News
  • Uncategorized

    सुटीवर आलेल्या जवानाचा मृतदेह विहिरीत आढळला; परिसरात खळबळ.

    May 15, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    लोहारी येथे माकडाच्या हल्ल्यात तीन जखमी, वनविभागाचा मनमानी कारभार नागरिकांचा आरोप.

    April 2, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    संसदरत्न खासदार डॉक्टर अमोल कोल्हे व कार्यसम्राट आमदार अशोक बापू पवार हे सुर्यवंशी परिवारासाठी ठरले देवदूत.

    June 10, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ. निताजी कायटे यांची कासोदा येथे बदली त्यांच्या जागी कृष्णा भोये यांची ...

    August 25, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedक्राईम जगत

    कुऱ्हाड बुद्रुक येथील भैरवनाथ बाबा शेत शिवारातील विद्युत चोरांवर धडक कारवाई.

    November 23, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • आपलं जळगाव

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • राजकीय

    पाचोरा शहर व तालुका भाजपा तर्फे उद्या विजबिल होळी आंदोलन

  • सांस्कृतिक

    आदिवाल परिवाराचा ०८ नोंहेबर रोजी पाचोरा येथे धम्म दिक्षा घेण्याचा ऐतिहासिक व परीवर्तवादी निर्णय.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज